कोऱ्या कागदावरचं पाहिलं अक्षर

दसऱ्याला पूजलेला ‘श्री’ कार…

अंतर्मनातून ओठी आलेला ओंकार

साऱ्याच अस्तित्व तू..

तू एकदंत..

तान्हयुल्याचा कोवळा स्पर्श

आईच्या कुशीतील अनावर हर्ष..

आजीच्या चेहऱ्यावरचं गोड़ हसू

साऱ्याच्या तळाशी तूच तू ..

तू एकदंत..

खळखळ वाहणारी नदी

अथांग पसरलेला सागर…

धीर-गंभीर हिमशिखरे

साऱ्यात भरून राहिलेला तू…

तू एकदंत..

तू निर्मोही, निराकार

तू चंचल तुझी कीर्ती अपार …

तू एक जाणीव, तू एक ध्यास

साऱ्या चराचराला व्यापलेला तू…

तू एकदंत..

तू गजानन, तू लंबोदर

नाना तुझी रूपं, नि अविष्कार

तू अनादी, तू अनंत..

साऱ्या आसमंतात दरवळलेला तू …

तू एकदंत..

पल्लवी कुलकर्णी-अत्रे

मेलबर्न

Leave a Reply